Surprise Me!

Ajit pawar'मुलांना शाळेत पाठवायचं, की नाही हा सर्वस्वी निर्णय पालकांचा' | School | SakalMedia |

2021-10-04 1,705 Dailymotion

Ajit pawar'मुलांना शाळेत पाठवायचं, की नाही हा सर्वस्वी निर्णय पालकांचा' | School | SakalMedia | <br />सातारा (satara) : पारनेर आणि संगमनेर तालुक्यात कोविडची रुग्ण संख्या वाढल्याने नगर जिल्ह्यातील ६१ गावांवर निर्बंध लावले आहेत. पुणे आणि नाशिक जिल्ह्याला फटका बसू नये यासाठी आत्ताच नगर जिल्ह्यातील दोन तालुक्यातील रुग्ण संख्या रोखण्यासाठी निर्णय घेतला गेल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज (सोमवार) उपमुख्यमंत्र्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात सातारा जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आजपासून राज्यात शाळा सुरू होत आहेत. परंतु, अद्याप १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण झालेले नाही. याबाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, १२ ते १८ वर्षाच्या मुलांचे लसीकरण करावे, अशी चर्चा आहे. अद्याप केंद्राकडून कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्राचा निर्णय झाल्यावर लसीकरण सुरू केले जाईल. परंतु, मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय पालकांचा असून अद्याप मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता दिसत नाही, असेही पवार यांनी नमूद केले. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)

Buy Now on CodeCanyon